सावळ्याच्या डोळ्यातील
सावळ्याच्या डोळ्यातील प्रीतकळ्या कोवळ्या कोवळ्या ...
झिरपती मनी माझ्या जणू नारळी झावळ्या झावळ्या...!
त्याच्या निळाईची गाज, माझ्या अंतरंगी साज...
खुणावता *त्या* ने मन खुळावले आज.
ये झडकरी न्यावया तुझ्या या सखीस
हे बघ लागले मी विलिनतेच्या तयारीस...
हे बघ लागले मी विलिनतेच्या तयारीस...
हे बघ लागले मी विलिनतेच्या तयारीस...!
- सौ. जयश्री पराग जोशी
5 ऑक्टोबर 2025
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा