पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नादखुळे सौंदर्य

हे सुवर्णकेशा, तुज पाहता मधाचा प्याला शोधाया निघालेले फुलपाखरू जाईल विसरुनी दिशा ....इतकी सुंदर आहेस तू...! हे मधुमती,तुझ्या चंचल पदन्यासाने मन्मथमनी स्वर तरंग उठतील इतकी सुंदर आहेस तू....! हे यौवन राणी, लावण्यखणी,तुज पाहता भ्रमर ही आळविल रागिणी इतकी सुंदर आहेस तू...! हे कांचन वर्णी, रुपगर्विता तुज पाहता ग्रीष्म ही होईल रसिक-राणी इतकी सुंदर आहेस तू...!सृष्टि कर्त्याने निर्मिलेली सृष्टी-निर्मात्री तू कुणीही न सुटती तुझ्या गोड पाशातूनी इतकी सुंदर आहेस तू..! आणि,आता हे सुचलंय 👇 हे स्त्री,तू अलका.. तू सुमित्रा कल्पना तू उमा तू तूच वृषाली आणि जयश्री ही तू अवनी-मंदाकिनी मनिषा वीणा साऱ्या ललना झाल्या गोळा तुज पाहून झाला नाद ही खुळा. - सौ. जयश्री पराग जोशी

रस्त्याच्या कडेला भक्तिची पंगत

बांबूंच्या छपराखाली मांडलेलं, हे छोटंसं दुकान, रंगबिरंगी सामानाची, जणू नुसती खाण! ​नारळांचे ढीग खाली, टोपल्यांमधून फुलं पिवळी, दर्शनासाठी चाललेल्या वाटेवर, जणू काही छोट्या छोट्या दिप ओळी.... 😊 ​लाल, हिरवी, पिवळी वस्त्रं, छतावरून लोंबतात, आईच्या ओढणीचे नक्षीदार तुकडे, हवेमधे झूलतात. ​बारीक नक्षीचे कुंकुम-हळदीचे करंडे, पूजेसाठी सज्ज, जणू भक्तीचे हंडे. ​मातीच्या रस्त्यावर, वस्तूंच्या रंगांची झाक मंदिरातून ऐकू येते चैतन्याची हाक.... ! ​येणारा-जाणारा प्रत्येकजण, क्षणभर थांबतो, डोळाभर सौभाग्य आणी हृदयभर भक्ती घेऊन मंदिरात जातो.😊🙏🏻