पृथ्वीची आई
वाटते ...
विराट अवतार धारण करावा....
मोठ्या मोठ्या बाहूंनी नद्या स्वच्छ कराव्या.
जल जीवांची फौज घेऊन सगळी सागर-पात्रं विसळून काढावीत.
एक मोठ्ठा झाडू घेऊन जगाच्या अंगणातलं प्लास्टिक झाडून टाकावं.
सूर्याला थोडा वेळ फ्रीजमधे झोपवून ठेवावं....
वाळवंटात आंबराई बनवावी आणि हिरवाई पेरावी.
हिमालयात शेकोटी पेटवावी आणि दूरच्या शिखरांवर पांघरूणे घालावी.
पृथ्वीची आई बनून तिला कुशीत घ्यावी...
चंद्राची बहिण होऊन लुटुपुटुची भांडणे करावी....
चांदण्यांचा हात धरुन मोठ्ठा फेर धरावा...
आणि...
आनंदाचा पावा आसमंतात घुमावा.
आणि, आनंदाचा पावा आसमंतात घुमावा.
सौ. जयश्री पराग जोशी
५ जून २०२४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा