ओलुसं पाणी

 


इवल्याशा पानवलीवर (अगदी छोटूसं पान) 🍃ओलुसं पाणी... 💧

किती तरी निरागस आणि  खूप खूप गुणी..! ☺

पानवलीचा हात धरुन धरला त्याने फेर 😇

शेतकऱ्याला म्हणाले आता बी पेर. 🌾

हसला शेतकरी म्हणाला तू तर इवलंस पाणी 😃

माझं वावर लय म्होटं तु तं हाय अश्रूच्या थेंबवाणी। 😝

हिरमुसलं पाणी...! मदत करावी होतं त्याच्या मनी। 😔

ओलुसं पाणी लागलं रडु और आणि मग लागला पाउस पडू। 😭

आनंदाने भरला पाण्याचा गडू 🍶ओलुसं पाणी लागले आकाशाला भिडू। 🌨

वावर झालं हिरवं बेट🏞 .... मानले आभार पावसाचे थेट। 🙏

ओलुसं पाणी खुद्कन हसलं, 🤭पानवलीच्या पाठीवर परत येऊन बसलं। 👶

जयश्री - २४ सप्टेंबर २०२४





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य