चांदणीचे घर
सागरी लहरी गाई चंदेरी लकेरी
वाट ही गहिरी जाई चांदणीच्या घरी.
सखे चल घाई घाई
आता नको थांबू बाई.
सागर निळाई आणि आभाळ निळाई
पावलाच्या खाली जणू फेस-मोती ठायी ठायी.
मन उचली पाऊल आणि ठेवी पुलावर
घेई झेप उंचावून जाई दूर चंद्रावर.
-सौ.जयश्री पराग जोशी
४ जून २०२४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा