समुद्राचे 'टिपूसपान'
एकदा समुद्राला लागली तहान
म्हणाला मला पाणी आण...
गेले तडक ढगाकडे मागितले पाणी
म्हणाला *ज्येष्ठ, सुरु आहे थांब गं राणी*.
तेवढ्यात एका ढगाने ऐकले
आतले टिपूस टवकारुन बसले.
समुद्राची तहान भागवावी कशी
कपाळावर बोट ठेवून विचार करु लागले.
हळूच डोकावले बाहेर म्हणाले मला
समुद्राची तहान भागवतो चला.
समुद्राचे झाले *टिपूसपान*
पावसाचा थेंब खूपच महान.. !
सौ. जयश्री पराग जोशी २४ सप्टेंबर २४ रात्री ११ ३०
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा