बाळ जन्मला, व्हॅंकुवरमधे.....

 *पौषमास*, त्यांत *कृष्ण दशमी* ही तिथी

गंधयुक्त तरिहि वात *शीत* हे किती ! (भारतात) 

*तीन* प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?

*बाळ जन्मला गं आत्या बाळ जन्मला||*

*विनीत च्या घरी आपुल्या बाळ जन्मला*||धृ||

*श्रुती* राणी आपुली हळूं उघडि लोचनें

दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें

ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला||१|| बाळ जन्मला गं आत्या बाळ जन्मला

*हिरवेगृहीं* येइ नवी सौख्य-पर्वणी... सौख्य-पर्वणी

 व्हॅंकुव्हरच्या नील नभी चमके चांदणी

आनंदाचा नाद तोंच धुंद कोंदला||२|| बाळ जन्मला गं आत्या बाळ जन्मला..... 

पेंगुळल्या आत्याबाईंना  जागवा जरा... जागवा जरा

काय काय’ करु नका  पुन्हां उभ्या रहा... 

उच्चरवें *रोहित काका* हंसुन बोलला||३||... बाळ जन्मला गं आत्या बाळ जन्मला.... 

वार्ता ही सुखद बघा पोंचली झणी... पोचली झणी

गृहांतुन मोबाईल जवळ धावले कुणी... धावले कुणी

*आत्यांचा संघ बघा गात चालला*||४|| बाळ जन्मला गं आत्या बाळ जन्मला... 

*फोन करी कुणी कुणी, कोणी मेसेज... कोणी मेसेज*

हास्याने खुलून गेले सर्व अग्रज... सर्व अग्रज

*मोबाईलचा कॉल* मात्र जलद वाजला||५|| बाळ जन्मला गं आत्या बाळ जन्मला... 

*आजोबांचे फोनरव बडोद्यात घुमले*

*काकूच्या आठवणीत कंठ दाटले*

*बावरले हिरवे*, जरी बेत आखला||६|| बाळ जन्मला गं आत्या बाळ जन्मला... 

*व्हॅंकुव्हरकरही* हळुच डोकावून पाहती.. डोकावून पाहती

गगनांतुन आज नवे रंग वाहती

*पाचूंचा* चूर नभीं भरुन राहिला||७|| बाळ जन्मला गं आत्या बाळ जन्मला.. 

बुडुनि जाय *हेत्वी-साक्षी* नृत्यगायनीं

*जया-सरोज* त्यांत मग्न आणि *अश्विनी*

डोलतसे *श्रुती* जरा *विनीत* डोलला||

प्रत्येक जण हा जणू डोलू लागला||८|| बाळ जन्मला गं आत्या बाळ जन्मला...

- बाळाची आत्या, सौ. जयश्री पराग जोशी. 

बडोदा. 

५ फेब्रुवारी २०२४.

( गीत रामायणातील "राम जन्मला गं सखे" वर आधारित.... चाल ही तशीच) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य