जीवा- शिवाचा मेळ

 

जळ जळात विलीन होता

जुळले नाते पाण्याशी पाण्याचे 

जसे आपल्याशी परमेश्वराचे

आत्म्याशी परमात्म्याचे. 

जीव, ... जे असती अंश त्याचे. 

ते परतती त्याच्याच कडे साचे. 


उमटला चित्रकाराचा अंतरंग

जलरंगानी बनले "जलतरंग".

रंग, ...... ते ही जळ

चित्र, ...... ते ही जळ. 

असाच असतो जीवा-शीवाचा मेळ.


एक आहे वास्तव

एक आहे आभास 

चित्रकाराच्या कुंचल्याने होतो

वास्तवाचा आभासाकडे प्रवास. 

सहज घाले गवसणी तो पंचमहाभूतास. 

जेव्हा "कला-सौंदर्य-कण" येती शरण त्यास. 


- सौ. जयश्री पराग जोशी


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य