लग्न विधी- मुहूर्ताच्या ओव्या
मांडवाच्या दारी उभ्याने गं विडा घेतो
विडा घेतो उभ्याने गं विडा घेतो... १
आदि मूळ चिठ्ठी तुळजापूर च्या लाडीला
लाडीला तुळजापूरच्या लाडीला.... २
आई अंबाबाईने वाघ जुंपिले
जुंपिले गाडीला वाघ जुंपिले गाडीला... ३
राजेश-सरोजच्या गं दारी बांधिले तोरण
बांधिले तोरण मामाने बांधिले तोरण.... ४
पियुषचे काका करी उभे इमल्यावर इमले
पुतण्याच्या लग्नासाठी गोत बहु जमले... ५
करवली ने काढली दारी छान गं रांगोळी
सुगंधी तेल लावून घातल्या आंघोळी.... ६
मांडवाच्या दारी आहेराची ठेलाठेली
ठेलाठेली आहेराची ठेलाठेली...
भावाच्या पाठी उभी आहे करवली....
करवली उभी आहे गं शरली/करवली.... ७
नवरदेवाचा भाऊ वरुण उभा रे पाठिशी
जसा लक्षुमण उभा रामाच्या पाठिशी..... ८
मुहूर्ताचा उखळ आणि पिवळी हळकुंडे
पियूषच्या आत्या आणि काकू या गं इकडे..... ९
कांडण्याचा आवाज येई खुडखूड
मामी आणि मावशीची सुरू झाली लुडबूड.... १०
जात्यावरी ओव्या सुंदर गाती गं सवाष्णी
आशिर्वाद देती ब्राह्मण, देशपांडे आहेत गं ऋणी... ११
सुरु आहे महिना शुभ मंगल कारतिक
पियूषच्या लग्नाचे सुरु आहे कवतिक.... १२
मांडवाच्या दारी बाई हळदीचा पाट गेला
नवरदेवाचा धाकटा भाऊ वरुण तूपवाढ्या झाला... १३
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा