*उजळी* अमावस

 सकाळी सकाळी🌄

दाराशी रांगोळी ❄️

दिवे उजळी 🪔

पूजेच्या वेळी 🙏🏻

समया पाजळी✨

वाहूया बाभळी🍃🌿

फुले ही पिवळी🌻🥀

छोटीशी दिवाळी🎆🎇

आहे आज. 🤗||१||


कमळ वात🪭

मंजुळी वात🪻

तेलाची वात🪔

तुपाची वात🕯️

टाकूया कात🪱

देऊया हात🤝

करुया मात🫰🏻

संकटांवर.👹 ||२||


अन्नपूर्णेचा वरद 🙌🏻

गृहिणीच्या हातात🤲🏻

भाताची मूद🍚

वरण साधं🥣

गोडाचा प्रसाद🍛

घालतो साद🗣️

सणावारी. ||३||🤷🏻‍♀️


सौ. जयश्री पराग जोशी

१७ जुलै २०२३

(दिव्याची आवस) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य