शब्द ब्रम्ह
✍️रचना आपण वाचतो ज्या
बघा तर खरं, कशा बनतात त्या? 🤔मनात उर्मी निर्माण करणाऱ्या... 😇
चिंब चिंब भिजवणाऱ्या... 😭💦☔
बघा तर खरं, ....... !
शब्द इथे-तिथे कसे सुंदर सजतात .....
मिरवतात😎, खुदकन् हसतात,
😊 मिश्किल पणे पहातात☺
हो ना...?
बघा तर खरं....!
आपण विचार करु शकत नाही
आणि ते सांगून जातात खूप काही. 🤗
त्यांच्या जगात पर्वत शिखरांना🏞 पंखं असतात ....... सागर 🌅बोलतात..... दूरची माणसं 😊जवळ येतात....
शब्द होतात दुलई.... शब्द होतात रजई.....
अगदी होतात गोधडी सुध्दा... आणि
साऱ्या भावनांना आपल्या पांघरूणात घेतात....
शब्द होतात फुले🥀...... शब्द होतात झुले... शब्द म्हणजे लहान मुले👩🍼....... आणि मनातील भावना हळूहळू हले.
शब्द लावतात पिसे..... शब्द करतात वेडेपिसे....
अशी करतात जादू🧚♀️ की रुसलेलं माणूस खुदकन् हसे.😄
शब्दांची मोरपिसे 🦚सगळ्या भाव रंगांना आपल्यात सामावून घेतात..
मानव सृष्टीला फुलवून, आणि भुलवून सुद्धा ठेवतात.
शब्द होतात सूर 🎼🎹..... आणि घालतात आकाशाला गवसणी. 👣
शब्द होतात भावनांचा पूर🌪.... आणि गातात मनातील गाणी. 🏞
शब्दां शिवाय या जगात नाही कशाचा लवलेश🤏
शब्द असतातच ब्रम्हा, विष्णु आणि महेश.... !🙏
चला तर मग करु या आता शब्द-रचनेचा "श्री गणेश".🤗
सौ. जयश्री पराग जोशी
😄
😄
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा