"शब्द आणि चित्र - प्रवास"
चित्रकार जेव्हा चित्र काढतो,
ब्रश आणि कागद सुंदर होतो
बघणाऱ्याचे डोळे सुंदर होतात....
मनात सुंदर विचार येतात
त्यातून सुंदर कविता होते...
ऐकणाऱ्या चे कान सुंदर होतात.... मन रंगून जाते
चित्रकाराच्या मनातील रंगांचा
असा प्रवास सुरु होतो...
डोळ्यातून मनात... मनातून कानात... कानातून हृदयात...
डोकावत जातो.
हुशार ते रंग... शब्दरूप लेवून बाहेर पडतात... ऐकणाऱ्याच्या मनावर हळूवार चंदनी लेप घालतात..
आणि सारं जग सुंदर करत जातात.
प्रश्न पडतो मला, हे असे कसे❓
उत्तर मिळत नाही म्हणून लागले पिसे.
चित्र काढणारा कोण, पाठवणारा कोण,
अर्थघटन करणारा कोण, आनंद घेणारा कोण... !
हे असं चैतन्य वर्तुळ पूर्ण करतं कोण?
नादखुळ्याचं प्रांगण सुशोभित करतं कोण?
अशी छोटी छोटी वर्तुळं,
जणू आनंदाची मूळं.
धरतात फेर, घालतात रिंगण
"नादखुळा" म्हणजे आमचंच अंगण...!
----------------------------------------------------------
सौ. जयश्री पराग जोशी.
सौ. जयश्री पराग जोशी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा