तारु आणि लाट
तिच्या मनातील उर्मी
जणू फेसाळत्या शुभ्र लाटा
तारु त्याचे हिंदोळते
शोधी नव्या नव्या वाटा |
तारु त्याचे आरुढ
करी लाटांवर गारुड
लाट धरी त्याचा हात
घेऊन जाया पैलपार... |
------------------------------------------------------------
सौ. जयश्री पराग जोशी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा