बहावा-बकुळ
बहावा-बकुळ
... वैशाखी भावनांना पालवी फुटली...
आणि बहाव्याशी बकुळ बोलू लागली ...☺️
तू सोनवर्णी 😎बहावा, मी नाजूक😌 बकुळ
तुझ्या मिठीत सामावण्यास झाले मी व्याकूळ.
तुझा भास...... तुझा ध्यास
मी येता तुझ्या अंगणी दरवळेल सुवास.😇
सोनवर्खी झुंबरं, ही तुझी खुबी...
पाहून सुखावली 'बकुळ' उभी उभी.
रणरणत्या🌤️ उन्हातही प्रणय तुझा फुलतो😍
अरे, बकुळीच्या मनातही मोगरा🥀 डोलतो.🫣
गहिवरला तो ही .... आला बहरुन🌝
बकुळीच्या मनी गेला मोहरुन.🌜
रोज होई गोष्टं रोज होई संवाद...
शब्दांचे मोरपीस🦚 दोघांच्या मनात.🙈
म्हणता म्हणता तो झाला बकुळ🌼, ती झाली बहावा🌞
कशी ही अशी निसर्गाची किमया! वाह् वा ! वाह् वा !
कुजबुजली🧖🏻♀️ बकुळ बहाव्याच्या कानात👂🏻
मी तुझ्या मनात आणि तू माझ्या डोळ्यांत.
तुझा रंग,🦋 माझा गंध...💃🏻
होऊ दे एक... होऊ या धुंद.
तुझा स्पर्श, माझं अंगं....
बकुळ-बहावा संग-संग.... !
"बहावी अधिरता" 🫀..... "बकुळी व्याकुळता"🫁
अधरांची देणी-घेणी 💋👄अन् श्वासांची उष्णता🗣️.
उराउरी भेटाभेटी🫂.. ... अंगी अनंग वरखाली🍃
त्याच्या ओठी👄 तिच्या गाली,🥰 गोडीगुलाबी बहरुन आली.👩❤️👨
बकुळीची बोटं रुतली 🤚🏻बहाव्याच्या दंडात..💪🏻
बहाव्याचे बाहू 💪🏻गुंतले बकुळीच्या अंगाअंगात ,👰😌
त्याचे झुंबर.🏮.. हिचे अंबर☁️☁️
त्याची पाने🍃...हिचे गाणे.🧏🏻♀️
त्याची नजर-पाकळी👁️, हिची सोनसाखळी..
अडकली एकमेकांत ..... सुरू झाली खेळी.
थरारली सोनसळी..... ओठी💋 तिच्या अस्फुट ओळी
आता तिची पाळी तर आता त्याची पाळी
दोघांची मने झाली खुळी...🤯
बकुळीचा बहावा झाला,बहाव्याची बकुळ
दोघांना एकमेकांचं लागलं खूळ.💕
बहावा तो बेधुंद😇..., बकुळीचा तो रुपगंध👸
एक होता श्वास दोघांचे,🫂 रुपकळीचे थरथरे अंग.
वेळ ही थांबली, ⏱️क्षणभर क्षण ही थबकले
रती-मदनाचे मधुमिलन 🤝झाले....!
उन्हाळी पहाटे बकुळ-बहावा एकमेकांत विलिन झाले.👩❤️💋👨
बहावा सुगंधी 😇झाला, बकुळ सोनेरी🌟 झाली
बागेतल्या झेब्र्याला ( पक्षी) 🐧रंगीबेरंगी किनार आली, खारुताईची पाठही🐿️ रंगीत झाली... कावळा आणि 🐦कोकिळा🦃 ही लाल- निळी होऊन उडून गेली.
🧔विश्वामित्राच्या नव्या सृष्टीत फक्त बहावा-बकुळी🌻🌼 उरली... !
🧔विश्वामित्राच्या नव्या सृष्टीत फक्त बहावा-बकुळी🌻🌼 उरली...!
सौ. जयश्री पराग जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा