स्वर-ज्ञानेश्वरी.

 ( बाल गायिका ज्ञानेश्वरी घाडगे हिच्या साठी लिहिलेली) 

अभिजात सूरांची, असे तू गं महाराणी
कंठात गं वसे तुझ्या, सुरेल गाणी-तराणी.
आसमंती झेपावता तुझ्या तानांचे गं मणी
आणी अंगी रोमांच आमुच्या आणि डोळाभर पाणी.

तुझे मंद्र सूर जणू मंदिरातील घुमटेदार प्रतिध्वनी.
मध्य सप्तक गं तुझे जणू, भरजरी स्वरसाज लेवूनी, ऊभे ठाकले अंगणी.
तुझे तार सप्तक ....! जणू "फील" असा असा...
समुद्राच्या तळापर्यंत जाई गोल गोल गोल भोवरा जसा.
तुझ्या घुमरीदार तानांनी होता घुसळण अंतरीचे
लोणी उसळूनी आले, आले आले भरते आनंदाचे.
तुझ्या लयदार लाटांचे गं वळे वळण वाकडे
पडती मोहाचे गं सडे जसे इकडे तिकडे.
....... ..... .....! .....! ......! .......!
काय म्हणावे तुला, शब्द नाहीत गं फार
तू *स्वर साक्षात्कार* की साक्षात् *स्वर-चमत्कार*?
जसा अवतरे जणू ईश्वर-चराचर...! !
स्वरांनी ल्यायलेले रूप म्हणू, म्हणू गुण की आकार?
की सद्गुणांचे अलंकार? स्वप्न आईचे साकार.. ?
म्हणू पित्याचा ओंकार.... ? की सोहम् चा हुंकार...?
जणू *भारतीय-संगीत-सूरधनुष्याचा* टणत्कार?
..................! ............. !
तुझ्या गूढ ताना येती, घेती भविष्याचा वेध
तुझ्या मुखातून बोले जणू साक्षात सामवेद. ..!
----------------------------------------------------
सौ. जयश्री पराग जोशी
२४ जून २०२३.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य