रोजच असतो, फादर्स डे.

 दादा, रोज लालबागेजवळून शाळेत जाताना खूप आठवण येते तुमची.... ! (दादा, तुमच्या आठवणीत...)


मन वेडं असतं
त्याला काहीच समजत नाही...
आपण काय करतो आहोत
..... योग्य आहे की नाही? 🙍‍♀️

उगाच वाट पहातं 🥺
म्हणतं "आला असाल तुम्ही"😇
भेट होईल बागेजवळ🐦🦚🌿🌳
थोडी निम्मी-शिम्मी.

पर्समधून आणलेले काजू 🤏 ठेवीन तुमच्या खिशात
तुमच्या चालत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृती👤 कडे बघताना माझं लक्ष नसतं कशात.

क्षणात येते भानावर... घालून भावनांना आवर
नसतं कुणी म्हणायला "जया, याच्यातून सावर".

ऋणानुबंध 🧣म्हणजे काय समजून घेते आहे🥺
मोठी होते आहे, विचार करते आहे, 🤔
जगाचे लोल-विलोल, भ्रम-विभ्रम जाणून घेते आहे. 🥴🙎‍♀️

काय चूक, काय बरोबर 🙇‍♀️
इतकुसं मन जातंय घाबरून  😕
डोळे मिटून पडून राहतंय माझ्या मनातल्या
तुमच्या खांद्यावर शांत होऊन. 😞

काय होईल भविष्यात घेते याची चाहूल
ठेवायचंय मला तुमच्या पावलावर पाऊल.
"ओ दादा " ठेवायचंय मला तुमच्या पावलावर पाऊल👣.

- सौ. जयश्री पराग जोशी
 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य