सुरमयी योगायोग
वारा आणि वेळू.
योग्य हाती पडता
झाली त्याची वेणू.
छिद्रातून जाता अहंकार वाहून
पोकळतेच्या गाभ्यातून
सूर येती राहून राहून.
सुरावटींची असंख्य रोपे
उठती तरारुन
मोहवती आसमंत
डोलून डोलून.
पान गाई, रान गाई
सूरासूरांच्या अगणित सयी
दुनिया ही मोहमयी
मन धावत तिथे जाई.
----------------------------- ----------------- --------
सौ. जयश्री पराग जोशी.
१० मे २०२३.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा