गंधरंग
पान सुगंधी, रान सुगंधी
श्वसून घेता नासिका सुगंधी
मन-मन, आनंदगंधी.
फूल रंगी पाकळी रंगी
पाहून होता चक्षु रंगी
हृदय बुडे आनंदरंगी.
बिंदू तरंगी जलतरंगी
कोण कुणात आधी दंगी?
कुंचला रंगात रंगी?
की.....
रंग कुंचल्यात गुंगी?
कळेना का वाजे अंगी मृदंगी?
चित्रकारास जणू मोह-गुंगी?
"रंग" गंधी की "गंध" रंगी?
सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख👌
उत्तर द्याहटवा