अशी एक शरणागती
चल उंच उंच जाऊ फार
जिथे भरार वाऱ्याचा थरार
मऊ ढग-फुलांना हात लावू
होऊ मस्त गार गार.
बेभान होऊ खाली येऊ
पुन्हा पुन्हा वर जाऊ
धरेशी नाते उजळून घेऊ
आकाशाशी जुळवून घेऊ.
पंख फुटल्यागत उडून घेऊ
विशाल गगन मुठीत घेऊ.
निराकाराचा अनुभव घेऊ
निरंकारी होऊन खाली येऊ.
आकाश तत्व मुठीत भरुन
पृथ्वी तत्वास शरण येऊ.
- सौ. जयश्री पराग जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा