कृष्णाशी वाटाघाट
ओठ तुझे, बासरी तुझी.... सूर माझे.
मयूर तुझा, पिसारा तुझा.... केकावली माझी.
मुद्रा तुझी, चित्त तुझे... चित्तातील भावना माझी.
डोळे तुझे, पापणी तुझी.... ओठांवरचे हसू माझे.
विश्व तुझे, मी ही तुझी.... तू फक्त माझा.
जगाचा आत्मा तू , परमात्मा तू.... पण अंतरात्मा "माझा".
🤗
-सौ. जयश्री पराग जोशी
६ फेब्रुवारी २०२३
Khup chhan
उत्तर द्याहटवा