निळुलं पाऊल
ए लडिवाळा...सगळंच तुझं!
तुझा घुंगूरवाळा, तुझी शाम-निळाई,...... तुझी "गीता माई"
मी फक्त आई..... गाईन अंगाई
याशिवाय माझ्या कडे काही नाही.
तुझं निळुलं पाऊल... परमेश्वरी कौल
भविष्याची चाहूल
माझ्या कडे फक्त "तुझ्या आईपणाचा" डौल.
विश्व म्हणते, तू "असा", तू "तसा".....
मला फक्त कळते तू माझ्या काळजावरचा "गोडसा ठसा".
व्यास म्हणतात तूच वेळ..विश्व म्हणजे तुझा खेळ.
तूच काळ, तूच टाळ, नियती ही तुझेच चाळ.....
पण मला कळते....तू तर आहेस " माझंच बाळ "... !
-सौ.जयश्री पराग जोशी
२४ ऑगस्ट २०२२.
Khup Chhan
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा