माणसांचे म्युझियम
एक माणूस साठीच्या दशकातला..
खूप रसाळ आणि पिकलेला
ऍंटिक पिस... !
त्याचा गंध, त्याचे गुण
त्याची कर्तबगारी त्याची खूण.
एक माणूस चाळीशीचा
खूप मधाळ
रापलेलं पिस...!
"मिश्किलपणाच्या चेहेऱ्यावरचा"
भाव ओढून बसलेला.
......
एक बाई सत्तरीची
शुभ्र कणिस...!
अनुभवानं वाकलेली
भावनांच्या कढईत परतलेली... !
एक मूल दीडच शहाणे
यूनिक पिस....!
उत्सुकतेने भरलेले,
"सगळे याचे" ठरलेले.
एक तरुणी बहरलेली
आंगोपांग मोहरलेली.
जणू,
शाल्मलीचा मधु प्याला
पळसाची भगवी अगन ज्वाला.
एक युवक तिशीचा
पिळदार मिशीचा
आबरुदार घराचा
रुबाबदार खांद्याचा.
एक किशोर विशीचा
अजून आईच्या कुशीचा
कन्या राशीचा,
नाजूक ठशीचा.
एक मुलगी बाराची
कमळी कामाची.
वडिलांच्या लाडाची
आजोबांच्या गोडीची.
एक माणूस चित्रकार, एक शिल्पकार
दोघांच्या कल्पना, कल्पनांचे आकार
वेगळे दोन पण कला प्रवासाचा एकच प्रकार
एक इतिहासकार, एक नाटककार
एक हास्य कलाकार,
एक रंगकर्मी, एकाच्या मनी नुसत्या उर्मी
एक दुष्टं .....ठेवी बोट वर्मी.
. ... ... टू बी कंटिन्युड...
- सौ. जयश्री पराग जोशी
९ मार्च २०२३
वाह काय विविधता रंगवली आहे
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखुपच छान
उत्तर द्याहटवा