रस्त्याच्या कडेला भक्तिची पंगत
बांबूंच्या छपराखाली मांडलेलं, हे छोटंसं दुकान, रंगबिरंगी सामानाची, जणू नुसती खाण! नारळांचे ढीग खाली, टोपल्यांमधून फुलं पिवळी, दर्शनासाठी चाललेल्या वाटेवर, जणू काही छोट्या छोट्या दिप ओळी.... 😊 लाल, हिरवी, पिवळी वस्त्रं, छतावरून लोंबतात, आईच्या ओढणीचे नक्षीदार तुकडे, हवेमधे झूलतात. बारीक नक्षीचे कुंकुम-हळदीचे करंडे, पूजेसाठी सज्ज, जणू भक्तीचे हंडे. मातीच्या रस्त्यावर, वस्तूंच्या रंगांची झाक मंदिरातून ऐकू येते चैतन्याची हाक.... ! येणारा-जाणारा प्रत्येकजण, क्षणभर थांबतो, डोळाभर सौभाग्य आणी हृदयभर भक्ती घेऊन मंदिरात जातो.😊🙏🏻