पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सूरमयी शब्दचित्रे

  चित्रातून शब्द.. शब्दांतून सूर.... सूरांतून येई भावनांचा पूर.  -------------------------- कारण, चित्राला असतो एक रंग.. भावनांना असतो एक गंध सूरांना असतो एक नाद. या तिघांना असते रसिकाची साद.... आणि ऐकली की दाद ही... चित्रातील रंग शब्दांना खुणावतात... शब्दांतली अक्षरे सुरांना बोलवतात... सुरांचे नाद मनाला भुलवतात... मनातील भावना चित्रात उतरतात. तेव्हा एक वर्तुळ पूर्ण होते. अशी अनेक वर्तुळं, एकमेकांत अडकतात, साखळी बनवतात, पैंजण बनवतात, सुंदर मनगटावर सजतात... भावविभोर डोळ्यांत थुईथुई नाचतात... आणि.... "नादखुळी " होऊन मनात रुणझुणतात.  

नादखुळे सौंदर्य

हे सुवर्णकेशा, तुज पाहता मधाचा प्याला शोधाया निघालेले फुलपाखरू जाईल विसरुनी दिशा ....इतकी सुंदर आहेस तू...! हे मधुमती,तुझ्या चंचल पदन्यासाने मन्मथमनी स्वर तरंग उठतील इतकी सुंदर आहेस तू....! हे यौवन राणी, लावण्यखणी,तुज पाहता भ्रमर ही आळविल रागिणी इतकी सुंदर आहेस तू...! हे कांचन वर्णी, रुपगर्विता तुज पाहता ग्रीष्म ही होईल रसिक-राणी इतकी सुंदर आहेस तू...!सृष्टि कर्त्याने निर्मिलेली सृष्टी-निर्मात्री तू कुणीही न सुटती तुझ्या गोड पाशातूनी इतकी सुंदर आहेस तू..! आणि,आता हे सुचलंय 👇 हे स्त्री,तू अलका.. तू सुमित्रा कल्पना तू उमा तू तूच वृषाली आणि जयश्री ही तू अवनी-मंदाकिनी मनिषा वीणा साऱ्या ललना झाल्या गोळा तुज पाहून झाला नाद ही खुळा. - सौ. जयश्री पराग जोशी