रांगोळी
रांगोळीचा शोध कुणी लावला? लोपामुद्रा अगस्त्य ऋषी यांची पत्नी होती. त्यांनी ऋग्वेदात २ भाग लिहिले आहेत. हे पती- पत्नी इतरांपासून दूर एका जागी राहत होते. लोक त्यांना साधू म्हणत. लोपामुद्रेला देवपूजेत त्यांच्या पतीला मदत करण्याची इच्छा होती. म्हणून, तिने यज्ञकुंडाचे अलंकरण, रांगोळी काढण्याची सुरुवात केली. यज्ञकुंड हे पूजास्थळ असते. लोपामुद्रेने पंचतत्वांना (आकाश, वारा, पाणी, पृथ्वी, आणि अग्नी) विनंती केली की पतीला प्रसन्न करण्यासाठी रंग द्यावे. तिने आकाशातून निळा, पाण्यातून हिरवा, मातीतून काळा, आगीतून लाल आणि वाऱ्यातून पांढरा रंग घेतला. त्यानंतर, त्या रांगोळीत पीठ, दाण्यांचा कूट, फुले आणि मसाले वापरून त्या रंगांचे हवे तसे मिश्रण करून सुरेख चित्रं, प्रतिकं काढली. आणि, अशा प्रकारे सुरू झाले रांगोळी काढणे.