पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काय काय देऊ तुला?

 काय देऊ तुला?  कोवळ्या उन्हाचा पसाभर कवडसा?  की........  माझ्या मनाचा, "तुझं प्रतिबिंब अडकलेला जादुई आरसा"?  काय देऊ....!  ओंजळभर मोगरी सुगंध?  की......  सावळ्या मातीने बनलेल्या माझ्या देहाचा मृद्गंध?  सांग ना रे, काय देऊ तुला?  ओला ओला भरार वारा?  की....  माझ्या निथळणाऱ्या गोलई कुंतलाचा भोवरा?  काय देऊ?  शुभ्र पांढरा समुद्री फेस?  की....  माझ्या गालावरची हास्याची रेष?  काय देऊ?  निरभ्र आकाशातील चांदी?  की....  तुझ्या मुख चंद्राला पहातानाची डोळ्यातील धुंदी?  आशाच्या गाण्यातील प्रणय गंध की माझ्या देहाचा स्पर्शगंध?  आकाशातील टिपूर चांदण्यांचं आंदण की माझ्या ओठांवर कोरलेलं गोडीचं गोंदण?  देऊ तुला नुकतीच उमललेली जुई ची कळी?  की देऊ "तुझ्या कडे पाहून गुलाबी झालेली कानाची पाळी"?  काय देऊ सांग ना...!  वाळुतला छोटुसा शंख? की माझ्या प्रीतपाखराचे रत्नकांचनी पंख?  वाहत्या पाण्याचा खळाळ देऊ की माझ्या देहाच्या वैशाखी भावनांचा सोनेरी झळाळ देऊ?  नव्या, ताज्या मोत...

*उजळी* अमावस

 सकाळी सकाळी🌄 दाराशी रांगोळी ❄️ दिवे उजळी 🪔 पूजेच्या वेळी 🙏🏻 समया पाजळी✨ वाहूया बाभळी🍃🌿 फुले ही पिवळी🌻🥀 छोटीशी दिवाळी🎆🎇 आहे आज. 🤗||१|| कमळ वात🪭 मंजुळी वात🪻 तेलाची वात🪔 तुपाची वात🕯️ टाकूया कात🪱 देऊया हात🤝 करुया मात🫰🏻 संकटांवर.👹 ||२|| अन्नपूर्णेचा वरद 🙌🏻 गृहिणीच्या हातात🤲🏻 भाताची मूद🍚 वरण साधं🥣 गोडाचा प्रसाद🍛 घालतो साद🗣️ सणावारी. ||३||🤷🏻‍♀️ सौ. जयश्री पराग जोशी १७ जुलै २०२३ (दिव्याची आवस) 

शब्द ब्रम्ह

 ✍️ रचना आपण वाचतो ज्या बघा तर खरं, कशा बनतात त्या? 🤔 मनात उर्मी निर्माण करणाऱ्या... 😇 चिंब चिंब भिजवणाऱ्या... 😭💦☔ बघा तर खरं, ....... ! शब्द इथे-तिथे कसे सुंदर सजतात ..... मिरवतात😎, खुदकन् हसतात, 😊 मिश्किल पणे पहातात☺ हो ना...? बघा तर खरं....! आपण विचार करु शकत नाही आणि ते सांगून जातात खूप काही. 🤗 त्यांच्या जगात पर्वत शिखरांना🏞 पंखं असतात ....... सागर 🌅बोलतात..... दूरची माणसं 😊जवळ येतात.... शब्द होतात दुलई.... शब्द होतात रजई..... अगदी होतात गोधडी सुध्दा... आणि साऱ्या भावनांना आपल्या पांघरूणात घेतात.... शब्द होतात फुले🥀...... शब्द होतात झुले... शब्द म्हणजे लहान मुले👩‍🍼....... आणि मनातील भावना हळूहळू हले. शब्द लावतात पिसे..... शब्द करतात वेडेपिसे.... अशी करतात जादू🧚‍♀️ की रुसलेलं माणूस खुदकन् हसे.😄 शब्दांची मोरपिसे 🦚सगळ्या भाव रंगांना आपल्यात सामावून घेतात.. मानव सृष्टीला फुलवून, आणि भुलवून सुद्धा ठेवतात. शब्द होतात सूर 🎼🎹..... आणि घालतात आकाशाला गवसणी. 👣 शब्द होतात भावनांचा पूर🌪.... आणि गातात मनातील गाणी. 🏞 शब्दां शिवाय या जगात नाही कशाचा लवलेश🤏 शब्द असतातच ब्...

"शब्द आणि चित्र - प्रवास"

  चित्रकार जेव्हा चित्र काढतो, ब्रश आणि कागद सुंदर होतो बघणाऱ्याचे डोळे सुंदर होतात.... मनात सुंदर विचार येतात त्यातून सुंदर कविता होते... ऐकणाऱ्या चे कान सुंदर होतात.... मन रंगून जाते चित्रकाराच्या मनातील रंगांचा असा प्रवास सुरु होतो... डोळ्यातून मनात... मनातून कानात... कानातून हृदयात... डोकावत जातो. हुशार ते रंग... शब्दरूप लेवून बाहेर पडतात... ऐकणाऱ्याच्या मनावर हळूवार चंदनी लेप घालतात.. आणि सारं जग सुंदर करत जातात. प्रश्न पडतो मला, हे असे कसे❓ उत्तर मिळत नाही म्हणून लागले पिसे. चित्र काढणारा कोण, पाठवणारा कोण, अर्थघटन करणारा कोण, आनंद घेणारा कोण... ! हे असं चैतन्य वर्तुळ पूर्ण करतं कोण? नादखुळ्याचं प्रांगण सुशोभित करतं कोण? अशी छोटी छोटी वर्तुळं, जणू आनंदाची मूळं. धरतात फेर, घालतात रिंगण "नादखुळा" म्हणजे आमचंच अंगण...!  ---------------------------------------------------------- सौ. जयश्री पराग जोशी.