पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बहावा-बकुळ

  बहावा-बकुळ ... वैशाखी भावनांना पालवी फुटली... आणि बहाव्याशी बकुळ बोलू लागली ...☺️ तू सोनवर्णी 😎बहावा, मी नाजूक😌 बकुळ तुझ्या मिठीत सामावण्यास झाले मी व्याकूळ. तुझा भास......  तुझा ध्यास मी येता तुझ्या अंगणी दरवळेल सुवास.😇 सोनवर्खी झुंबरं, ही तुझी खुबी... पाहून सुखावली 'बकुळ' उभी उभी. रणरणत्या🌤️ उन्हातही प्रणय तुझा फुलतो😍 अरे, बकुळीच्या मनातही मोगरा🥀 डोलतो.🫣 गहिवरला तो ही .... आला बहरुन🌝 बकुळीच्या मनी गेला मोहरुन.🌜 रोज होई गोष्टं रोज होई संवाद... शब्दांचे मोरपीस🦚 दोघांच्या मनात.🙈 म्हणता म्हणता तो झाला बकुळ🌼, ती झाली बहावा🌞 कशी ही अशी निसर्गाची किमया! वाह् वा ! वाह् वा ! कुजबुजली🧖🏻‍♀️ बकुळ बहाव्याच्या कानात👂🏻 मी तुझ्या मनात आणि तू माझ्या डोळ्यांत. तुझा रंग,🦋 माझा गंध...💃🏻 होऊ दे एक... होऊ या धुंद. तुझा स्पर्श, माझं अंगं.... बकुळ-बहावा संग-संग.... ! "बहावी अधिरता" 🫀..... "बकुळी व्याकुळता"🫁 अधरांची देणी-घेणी 💋👄अन् श्वासांची उष्णता🗣️. उराउरी भेटाभेटी🫂.. ... अंगी अनंग वरखाली🍃 त्याच्या ओठी👄 तिच्या गाली,🥰 गो...

स्वर-ज्ञानेश्वरी.

 ( बाल गायिका ज्ञानेश्वरी घाडगे हिच्या साठी लिहिलेली)  अभिजात सूरांची, असे तू गं महाराणी कंठात गं वसे तुझ्या, सुरेल गाणी-तराणी. आसमंती झेपावता तुझ्या तानांचे गं मणी आणी अंगी रोमांच आमुच्या आणि डोळाभर पाणी. तुझे मंद्र सूर जणू मंदिरातील घुमटेदार प्रतिध्वनी. मध्य सप्तक गं तुझे जणू, भरजरी स्वरसाज लेवूनी, ऊभे ठाकले अंगणी. तुझे तार सप्तक ....! जणू "फील" असा असा... समुद्राच्या तळापर्यंत जाई गोल गोल गोल भोवरा जसा. तुझ्या घुमरीदार तानांनी होता घुसळण अंतरीचे लोणी उसळूनी आले, आले आले भरते आनंदाचे. तुझ्या लयदार लाटांचे गं वळे वळण वाकडे पडती मोहाचे गं सडे जसे इकडे तिकडे. ....... ..... .....! .....! ......! .......! काय म्हणावे तुला, शब्द नाहीत गं फार तू *स्वर साक्षात्कार* की साक्षात् *स्वर-चमत्कार*? जसा अवतरे जणू ईश्वर-चराचर...! ! स्वरांनी ल्यायलेले रूप म्हणू, म्हणू गुण की आकार? की सद्गुणांचे अलंकार? स्वप्न आईचे साकार.. ? म्हणू पित्याचा ओंकार.... ? की सोहम् चा हुंकार...? जणू *भारतीय-संगीत-सूरधनुष्याचा* टणत्कार? ..................! ............. ! तुझ्या गूढ ताना येती,...

सोनेरी उन्हाळा

 उन्हाळा म्हणू की सोनाळा म्हणू?  मोहरलेला गुल  बहरलेला बहावा वसंताची चाहूल पाचूं नी मरवा.  दारची तुळस  भगवा पळस दुपारी १२ चा सोनेरी कळस.  मामाचा जिव्हाळा  आंब्याचा मळा ,  मातीचे सारवण आजीचा "खुळा" (वेडा)  अंगणातला चाळा चुरचुरणारा पाचोळा...  वाळलेला पापड अंगातलं नवं कापड मनात घोळा.  उन्हाळी पहाट  रविवारचा हाट ऊसाचा रस आणि आइस्क्रीम साठी वाट लवकर पळा.  उन्हाळा म्हणजे गरम गरम झळा सोनाळा म्हणजे सावळ मामीचा गोतावळा...  तिच्या त्या मोगरकळ्या (सुंदर हास्य)  करी शीतल सगळ्या वेळा.  दुपारची उन्हं कैरीचं पन्हं मामीचं बाळ तान्हं किती गोड हसतं, पहा नं...!  उन्हाळ्यात संध्याकाळी झाडांची आळी पाणी घालायला  नुसती पळापळी.  उन्हाळ्याची रात्र गार गार गात्रं मनात चैत्र संगतीला मैत्र.  असा हा उन्हाळा खूप खूप खेळा.  मित्रांचा मेळा आजोबा आले की सुसाट पळा.  - सौ. जयश्री पराग जोशी

रोजच असतो, फादर्स डे.

  दादा, रोज लालबागेजवळून शाळेत जाताना खूप आठवण येते तुमची.... ! (दादा, तुमच्या आठवणीत...) मन वेडं असतं त्याला काहीच समजत नाही... आपण काय करतो आहोत ..... योग्य आहे की नाही? 🙍‍♀️ उगाच वाट पहातं 🥺 म्हणतं "आला असाल तुम्ही"😇 भेट होईल बागेजवळ🐦🦚🌿🌳 थोडी निम्मी-शिम्मी. पर्समधून आणलेले काजू 🤏 ठेवीन तुमच्या खिशात तुमच्या चालत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृती👤 कडे बघताना माझं लक्ष नसतं कशात. क्षणात येते भानावर... घालून भावनांना आवर नसतं कुणी म्हणायला "जया, याच्यातून सावर". ऋणानुबंध 🧣म्हणजे काय समजून घेते आहे🥺 मोठी होते आहे, विचार करते आहे, 🤔 जगाचे लोल-विलोल, भ्रम-विभ्रम जाणून घेते आहे. 🥴🙎‍♀️ काय चूक, काय बरोबर 🙇‍♀️ इतकुसं मन जातंय घाबरून  😕 डोळे मिटून पडून राहतंय माझ्या मनातल्या तुमच्या खांद्यावर शांत होऊन. 😞 काय होईल भविष्यात घेते याची चाहूल ठेवायचंय मला तुमच्या पावलावर पाऊल. "ओ दादा " ठेवायचंय मला तुमच्या पावलावर पाऊल👣. - सौ. जयश्री पराग जोशी  

सुरमयी योगायोग

  वारा आणि वेळू.  योग्य हाती पडता  झाली त्याची वेणू.  छिद्रातून जाता अहंकार वाहून पोकळतेच्या गाभ्यातून सूर येती राहून राहून.  सुरावटींची असंख्य रोपे उठती तरारुन मोहवती आसमंत डोलून डोलून.  पान गाई, रान गाई सूरासूरांच्या अगणित सयी दुनिया ही मोहमयी मन धावत तिथे जाई.  ----------------------------- -----------------   --------     सौ. जयश्री पराग जोशी.  १० मे २०२३.

गंधरंग

 पान सुगंधी, रान सुगंधी श्वसून घेता नासिका सुगंधी मन-मन,  आनंदगंधी.  फूल रंगी पाकळी रंगी पाहून होता चक्षु रंगी हृदय बुडे आनंदरंगी.  बिंदू तरंगी जलतरंगी कोण कुणात आधी दंगी?  कुंचला रंगात रंगी?  की.....  रंग कुंचल्यात गुंगी?  कळेना का वाजे अंगी मृदंगी?  चित्रकारास जणू मोह-गुंगी?  "रंग" गंधी की "गंध" रंगी? 

तारु आणि लाट

 तिच्या मनातील उर्मी  जणू फेसाळत्या शुभ्र लाटा तारु त्याचे हिंदोळते  शोधी नव्या नव्या वाटा | तारु त्याचे आरुढ करी लाटांवर गारुड लाट धरी त्याचा हात घेऊन जाया पैलपार... | ------------------------------------------------------------ सौ. जयश्री पराग जोशी. 

शब्द-कलेवर

 भावना निघून गेल्या.....शब्द राहिला एकला कधी अर्थाला मी सापडले नाही तर कधी अर्थ मला. मरुन गेलेल्या भावनांची शब्द-कलेवरे सोडाया...  आले मी सागरतटी माझेच विसर्जन कराया..... ! 

अशी एक शरणागती

चल उंच उंच जाऊ फार जिथे भरार वाऱ्याचा थरार मऊ ढग-फुलांना हात लावू होऊ मस्त गार गार.  बेभान होऊ खाली येऊ पुन्हा पुन्हा वर जाऊ धरेशी नाते उजळून घेऊ आकाशाशी जुळवून घेऊ.  पंख फुटल्यागत उडून घेऊ विशाल गगन मुठीत घेऊ.  निराकाराचा अनुभव घेऊ निरंकारी होऊन खाली येऊ.  आकाश तत्व मुठीत भरुन पृथ्वी तत्वास शरण येऊ.  - सौ. जयश्री पराग जोशी