पोस्ट्स

रस्त्याच्या कडेला भक्तिची पंगत

बांबूंच्या छपराखाली मांडलेलं, हे छोटंसं दुकान, रंगबिरंगी सामानाची, जणू नुसती खाण! ​नारळांचे ढीग खाली, टोपल्यांमधून फुलं पिवळी, दर्शनासाठी चाललेल्या वाटेवर, जणू काही छोट्या छोट्या दिप ओळी.... 😊 ​लाल, हिरवी, पिवळी वस्त्रं, छतावरून लोंबतात, आईच्या ओढणीचे नक्षीदार तुकडे, हवेमधे झूलतात. ​बारीक नक्षीचे कुंकुम-हळदीचे करंडे, पूजेसाठी सज्ज, जणू भक्तीचे हंडे. ​मातीच्या रस्त्यावर, वस्तूंच्या रंगांची झाक मंदिरातून ऐकू येते चैतन्याची हाक.... ! ​येणारा-जाणारा प्रत्येकजण, क्षणभर थांबतो, डोळाभर सौभाग्य आणी हृदयभर भक्ती घेऊन मंदिरात जातो.😊🙏🏻

धूसर आठवणींची सांजवेळ

​धूसर हे छायाचित्र, जणू आठवणींची सांजवेळ, वार्धक्याच्या वाटेवर सुरु झाले विस्मृतीचे खेळ. ​पायवाटेवर मावळतीचा तोल आणि क्षितिजावरची ओल; मागे वळून पाहताना डोळ्यात दाटे काळोख आणि राहून गेलेले बोल. ​प्रत्येक चेहरा इथे, एका जुन्या गोष्टीची कडी, हसणे, रुसणे, सोबत राहणे, जीवनाची ती गोडी. ​कधीतरी वाटतं, कालचीच गोष्ट आहे ती, क्षणार्धातच कळतं, मुठीतून सुटलेली रेती ती. डोळ्यांनी पाहिलेलं जग, तेच आता होतंय धूसर, सत्यातील स्वप्ना, आता तूच हा पदर पसर. आजच्या या सांजवेळी, फक्त एकच माझी आस, राहू दे उरलेले क्षण, तुमच्या आठवणींच्या आसपास. राहू दे उरलेले क्षण, तुमच्या आठवणींच्या आसपास. राहू दे उरलेले क्षण, तुमच्या आठवणींच्या आसपास. - सौ. जयश्री पराग जोशी 5 ऑक्टोबर 2025

सावळ्याच्या डोळ्यातील

सावळ्याच्या डोळ्यातील प्रीतकळ्या कोवळ्या कोवळ्या ...  झिरपती मनी माझ्या जणू नारळी झावळ्या झावळ्या...!   त्याच्या निळाईची गाज, माझ्या अंतरंगी साज...  खुणावता *त्या* ने मन खुळावले आज. ये झडकरी न्यावया तुझ्या या सखीस हे बघ लागले मी विलिनतेच्या तयारीस... हे बघ लागले मी विलिनतेच्या तयारीस... हे बघ लागले मी विलिनतेच्या तयारीस...! - सौ. जयश्री पराग जोशी 5 ऑक्टोबर 2025

रस्त्याच्या कडेला भक्तिची पंगत

 * ​बांबूंच्या छपराखाली मांडलेलं, हे छोटंसं दुकान, रंगबिरंगी सामानाची, जणू नुसती खाण! ​नारळांचे ढीग खाली, टोपल्यांमधून फुलं पिवळी, दर्शनासाठी चाललेल्या वाटेवर, जणू काही छोट्याश्या दिप ओळी.... 😊 ​लाल, हिरवी, पिवळी वस्त्रं, छतावरून लोंबतात, आईच्या ओढणीचे नक्षीदार तुकडे, हवेमधे झूलतात. ​बारीक नक्षीचे कुंकुम-हळदीचे करंडे, पूजेसाठी सज्ज, जणू भक्तीचे हंडे. ​मातीच्या रस्त्यावर, वस्तूंच्या रंगांची झाक मंदिरातून ऐकू येते चैतन्याची हाक.... ! ​येणारा-जाणारा प्रत्येकजण, क्षणभर थांबतो, डोळाभर सौभाग्य आणी हृदयभर भक्ती घेऊन मंदिरात जातो.😊🙏🏻

उसवण मनाची

 आत काही तरी तुटलं होतं.... १० डिसेंबर २०२० पहाट ३:३० ----------------------------------------------------- ड्रेसची "शिलाई" उसवायला घेतली.... पहिला टाका.... अतिशय घट्ट होता.... "लॉक्ड" होता.  हो, तो तसा मुद्दामच असतो... "उसवण" होऊ नाही म्हणून. तो सेफ्टी पिनच्या टोकाने काढला. सेफ्टी पिनचं टोक "व्हिलन" वाटत होतं... दोऱ्याचं टोक निघालं.... मग, जसजसा दोन्ही बाजूने दोरा ओढत गेले, मन ही उसवत गेलं त्या बरोबर. खरं सांगू....!  डोक्यात उद्रेक करणाऱ्या पाऱ्यासारख्या सुळसुळ विचारांना एकत्र आणून शब्दांत "शिवणं" महाकठीण काम असतं. शब्दं- तुकडे न सापडून चिडचिड होते, विचारांची लय अस्तव्यस्त होते... अंतरीच्या भावना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनाला फेकत असतात.... थोडक्यात,  ड्रेस उसवणं सोपं असेल ही पण, मनाचं "उसवणं" अवघड असतं. .... चिमटीत आलेला दोरा ओढत होते.... दोरा तुटत होता.... आणी, आत काही तरी तुटत होतं. "......मन गुंतायला वेळ लागत नाही" असं म्हणतात. "पाराच" तो ..... सुटला होता....... पण, वेळ लागतो गुंतलेल्या मनाला आवरा...

पृथ्वीची आई

 वाटते ...  विराट अवतार धारण करावा....  मोठ्या मोठ्या बाहूंनी नद्या स्वच्छ कराव्या.  जल जीवांची फौज घेऊन सगळी सागर-पात्रं विसळून काढावीत. एक मोठ्ठा झाडू घेऊन जगाच्या अंगणातलं प्लास्टिक झाडून टाकावं.  सूर्याला थोडा वेळ फ्रीजमधे झोपवून ठेवावं....  वाळवंटात आंबराई बनवावी आणि हिरवाई पेरावी.  हिमालयात शेकोटी पेटवावी आणि  दूरच्या शिखरांवर पांघरूणे घालावी.  पृथ्वीची आई बनून तिला कुशीत घ्यावी...  चंद्राची बहिण होऊन लुटुपुटुची भांडणे करावी....  चांदण्यांचा हात धरुन मोठ्ठा फेर धरावा...  आणि...  आनंदाचा पावा आसमंतात घुमावा.  आणि, आनंदाचा पावा आसमंतात घुमावा.  सौ. जयश्री पराग जोशी ५ जून २०२४

समुद्राचे 'टिपूसपान'

 एकदा समुद्राला लागली तहान म्हणाला मला पाणी आण...  गेले तडक ढगाकडे मागितले पाणी म्हणाला *ज्येष्ठ, सुरु आहे थांब गं राणी*.  तेवढ्यात एका ढगाने ऐकले  आतले टिपूस टवकारुन बसले.  समुद्राची तहान भागवावी कशी कपाळावर बोट ठेवून विचार करु लागले.  हळूच डोकावले बाहेर म्हणाले मला समुद्राची तहान भागवतो चला.  समुद्राचे झाले *टिपूसपान* पावसाचा थेंब खूपच महान.. !  सौ. जयश्री पराग जोशी २४ सप्टेंबर २४ रात्री ११ ३०